आजपासून रत्नागिरीत कडकडीत लाॅकडाऊन

आजपासून रत्नागिरीत कडकडीत लाॅकडाऊन
Ratnagiri Lock Down

रत्नागिरी :  रत्नागिरीत Ratnagiri आजपासून कडक लाॅकडाऊन Lock Down असणार आहे 9 जून पर्यंत हा कडकडीत लाॅकडाऊन असेल. केवळ मेडीकल Medical सेवा वगळता सर्व दुकानंही बंद असणार आहेत. Lock Down in Ratnagiri Till Ninth June to Curb Corona

रत्नागिरीत कोरोना Corona रुग्णांची संख्या दिवसागणीक वाढताना दिसतेय. दिवसाला सरासरी 500 पेक्षा अधिक कोरोना बाधीत रुग्ण सापडताहेत. सध्याच्या घडीला 4 हजारांहून अधिक अॅक्टीव्ह रुग्ण रत्नागिरीत आहेत. रुग्णाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.

हे देखिल पहा

रुग्णांची वाढती संख्या जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरतेय. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाकडून 3 जून ते 9 जून पर्यंत कडकडीत लाॅडाऊन करण्यात आलाय. यात मेडीकल सेवेव्यतितीरीक्त कुणालाही मुभा देण्यात आलेली नाही. तर कृषी विषयक दुकानं केवळ दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. 

बाकी सर्व दुकानं बंद असणार आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमा देखील आता बंद करण्यात आल्यात. जर अत्यावश्यक असेल त्यांनाच रत्नागिरीत प्रवेश  मिळेल. मात्र, त्यासाठी कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट जवळ ठेवावा लागले. अन्यथा कुणाला रत्नागिरीत प्रवेश करता येणार नाही. Lock Down in Ratnagiri Till Ninth June to Curb Corona

रत्नागिरीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हा लाँकडाऊन करण्यात आलाय आणि त्याची अंमलबजावणी सुरु झालीय.त्यामुळे रत्नागिरीच्या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेत असलेलीच वाहन दिसत आहेत. तुरळक वाहनांची वर्दळ रत्नागिरीत पहायला मिळते आहे.

Edited By - Amit Golwalkar
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com