दिल्लीत आजपासून ६ दिवसांसाठी लॉकडाऊन

दिल्लीत आजपासून ६ दिवसांसाठी लॉकडाऊन
Six Days in Delhi Announces CM Arvind Kejariwal

नवी दिल्ली - दिल्लीत New Delhi कोरोनाच्या रुग्णांची संख्या एका दिवसात २५४६२ झाल्याने पेक्षा जास्त प्रकरणे नोंदविल्यानंतर दुसर्‍या दिवशी अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने सहा दिवसांच्या लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. Lockdown in Delhi for six days from today announcement by CM Arvind Kejriwal

दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहरातील कोरोनाच्या Corona बिघडलेल्या परिस्थितीबद्दल उपराज्यपाल अनिल बैजल Anil Baijal यांच्यासमवेत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. ६ दिवसाचा लॉकडाउन Lock Down आज रात्री १० वाजेपासून अंमलात येईल आणि २६ एप्रिल रोजी (पुढील सोमवारी) सकाळी ५ वाजेपर्यंत हा लाॅकडाऊन राहणार आहे. या काळात आवश्यक सेवांना परवानगी दिली जाईल.

कोविड रुग्णांसाठी राष्ट्रीय राजधानीत ऑक्सिजन आणि रुग्णालयाच्या बेडची तीव्र कमतरता आहे. विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी नवीन निर्बंध लावण्यात आलेले आहेत असे केजरीवालांनी सांगितले.Lockdown in Delhi for six days from today announcement by CM Arvind Kejriwal

आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीत कोविडच्या  रूग्णांसाठी राखीव असलेल्या उपलब्ध बेडची संख्या जलद गतीने कमी होत आहे आणि कोरोना रुग्णांना गरज पडल्यास ऑक्सिजनची तीव्र कमतरता आहे.वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जर आपण कठोर उपाययोजना अमंलात आणल्या नाहीत तर दिल्लीची आरोग्य सेवा कोलमडेल, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीय कामगारांना शहर न सोडण्याचे आवाहनही केले.“दिल्लीत ऑक्सिजनची तीव्र कमतरता आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, दिल्लीला सामान्य पुरवठ्यापेक्षा पुरवठा खूप जास्त आवश्यक आहे. पुरवठा वाढवण्याऐवजी आमचा सामान्य पुरवठा झपाट्याने कमी झाला आहे.  आणि दिल्लीचा कोटा अन्य राज्यात वळविण्यात आला आहे,'' असे ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे. Lockdown in Delhi for 6 days from today announcement by CM Arvind Kejriwal

कोविडच्या  प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना कोरोना रूग्णांसाठी केंद्र सरकारच्या रूग्णालयात ऑक्सिजन  बेड आरक्षित करण्याची विनंती करणारे पत्र पाठवले आहे. 

Edited By - Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com