पाचाड गावात टाळेबंदी; शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमी कसे येणार?
raigad

पाचाड गावात टाळेबंदी; शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमी कसे येणार?

रायगड: किल्ले रायगडच्या (Raigad Fort) पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने टाळे बंदी लावली आहे.  गावात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत असल्याने ग्रामस्थांनी हा निर्यय घेतला असुन यामध्ये शासनाच्या नियमाच्या अधिन राहुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल, लॉजिंग व्यवसाय पुर्णपणे बंद केले आहेत.  त्याला परिसरातील ग्रामस्थ आणि व्यवसायीकांनी सकारात्मक प्रतिसाद देत व्यवसाय बंद केले आहेत.  

6 जूनला शिवराज्याभिषेकदिन सोहळा येत आहे.  छत्रपती खा. संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 6 जूनला किल्ले रायगडावर येण्याचे शिवप्रेमींना आवाहन केले आहे.  यामुळे पाचाड गावातील टाळेबंदी वादाचा मुद्दा ठरणार आहे.  गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी ग्रामस्थांनी टाळे बंदीचा निर्णय घेतला आहे.  शिवप्रेमींनी सहकार्य करावे असे आवाहन पाचाड ग्रामस्थांनी केले आहे. (Lockout in Pachad village)

हे देखील पाहा

दरम्यान, राज्यातील मराठा आरक्षण Maratha reservation आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या छत्रपती संभाजीराजे  Sambhaji Raje Chhatrapati यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक Coronation सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला आहे. कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू केले आहेत.  मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे संभाजीराजे यांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना यावेळी सांगितले आहे. ते मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले आहे.

आता 6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे यांची कोणती नवी घोषणा करणार, याकडे सर्वांची नजर लागली आहे. 2 जून रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. संभाजीराजे यांनी आतापर्यंत राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तीन दिवसांपूर्वीच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यावेळी संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या पाच प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या.

6 जूनपर्यंत राज्य सरकारने या मागण्यांची दखल घेऊन काही निर्णय नाही घेतला तर, आम्ही रायगडावरून आंदोलन सुरु करू आणि त्याचे नेतृत्व स्वतः मी करेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला होता. राज्य सरकारला आरक्षणाच्या बाबतीत पुढे काय करू शकतो यासाठी संभाजी राजेंनी ३ पर्याय सांगितले आहेत असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते.   

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com