शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनास ठोकले कुलूप
Locks knocked on the door of the education officer

शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनास ठोकले कुलूप

धुळे - धुळे जिल्ह्याला Dhule district कायम शिक्षणाधिकारी Education Officer नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित काम पूर्ण होत नाही. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या Maharashtra Teachers Association पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप Lock ठोकून प्रशासनाचा निषेध केला आहे. (Locks knocked on the door of the education officer)

धुळे जिल्ह्याला गेल्या दोन वर्षांपासून Two Years शिक्षण विभागामध्ये प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागांना कायम शिक्षणाधिकारी नाही. त्यामुळे शिक्षण विभागाशी निगडित कर्मचाऱ्यांच्या पेन्शन Pension संदर्भात त्याचबरोबर मेडिकल Medical संदर्भात तसेच बीएफ संदर्भातील सर्वच कामे प्रलंबित पडून आहेत.

हे देखील पहा - 

शिक्षण अधिकाऱ्याचे पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांना धुळे जिल्हा शिक्षण अधिकारी या पदावर अतिरिक्त कारभार दिला जात आहे. तसेच त्यामुळे जिल्ह्याबाहेरील अधिकारी क्वचितच धुळे जिल्ह्यात येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपली प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

धुळे जिल्ह्याला कायम शिक्षण अधिकारी मिळावा यासाठी  विविध संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. परंतु या निवेदनाकडे व मागणीकडे 
गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन तर्फे गेल्या दोन वर्षापासून शिक्षण अधिकारी गायब आहेत. तसेच आपण यांना पाहिलेत का असे फलक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालना बाहेर लावण्यात आले आहेत. यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनास कुलूप ठोकून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या संघटनेतर्फे करण्यात आला आहे.

पुढील काही दिवसांमध्ये प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष द्यावे. धुळे जिल्ह्याला कायम शिक्षण अधिकारी न दिल्यास यापेक्षाही तीव्र पद्धतीचे आंदोलन करणार अशी माहिती संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे. 

Edited By - Puja bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com