विकेंड लाॅकडाऊननंतरही तीन दिवस लोणावळा राहणार बंदच!

विकेंड लाॅकडाऊननंतरही तीन दिवस लोणावळा राहणार बंदच!
Lonavala to remain locked down till wednesday

लोणावळा : पुणे Pune मुंबईकरांच्या Mumbai पसंती उतरलेल्या पर्यटन स्थळ Tourist Centre म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यात Lonavala पाच दिवसांचा कडक बंद जाहीर करण्यात आला आहे. शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. नगरपरिषदेच्या वतीने विकेंड लाॅकडाऊनला Lock Down जोडून पुढील तीन दिवस संपुर्ण शहर कडकडीत बंद ठेवत शहरात पुर्णतः सॅनिटायझेशन मोहिम राबविण्यात येणार आहे.Lonavala To remain locked down till next wednesday

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपुर्ण बैठक पार पडली. त्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शहरात चोवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासनाने घोषित केलेल्या संचारबंदीला वाटाण्याच्या अक्षता लावून नागरिक मोठ्या संख्येने सर्वत्र मुक्त संचार करीत आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी अनेकदा कळकळीची विनंती करूनही नागरिक त्यांच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करीत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. लोणावळा शहरात कडक पोलिसांचा Police बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  लोक रस्त्यावर बिना कामाचे फिरताना आढळल्यास त्यांची रस्त्यावर कोरोना चाचणी करुन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com