बँकेसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बँकेसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
yavatmal

यवतमाळ - जिल्ह्यातील पुसद Pusad येथे यवतमाळ मध्यवर्ती बँकेसमोर Bank ग्राहकांनी एकाच गर्दी केली. अनेकांनी चेहऱ्यावर मास्कही लावले नव्हते. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा Social Distance मात्र फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. Long queues of customers in front of the bank

यवतमाळ जिल्ह्यात आजपासून लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहे. यामुळे नागरिक मात्र सैराट झाल्याचे समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे ग्राहकांनी बँकेसमोर एकच गर्दी केली आहे. सध्या शेतकऱ्यांचे शेतीचे कामे सुरु झाली आहेत . त्यामुळे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी  बॅंकेसमोर प्रचंड गर्दी केली आहे.

या शिवाय शेतकरी सन्मान निधीचे पैसे बँकेत जमा झाले आहेत .तसेच पीक विमा कंपनीकडून बँकेत पैसे जमा करण्यात आले आहे . यामुळे शेतकऱ्यांनी यवतमाळ मध्यवर्ती बँकेसमोर प्रचंड गर्दी केली आहे. गर्दीला  कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. Long queues of customers in front of the bank

हे देखील पहा -

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट उतरत असल्याचे चित्र समोर येत आहे . त्यामुळे नागरिक काहीसे बिनधास्त झाल्याचे दिसून येत आहे . कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी कोरोना पूर्णतः गेला नाही म्हणूनच नागरिकांनी कोरोनाच्या नियमांची त्रिसूत्री पाळावी आवाहन करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com