लातुरात बाजारातील महाबीज बियाणे आणि खत संपले; शेतकरी संकटात !

लातुरात बाजारातील महाबीज बियाणे आणि खत संपले; शेतकरी संकटात !
Mahabeej seeds and fertilizers in the market in Latur ran out

लातूर: निसर्गाची अवकृपा असलेल्या लातूर जिल्ह्यात आता महाबीज सोयाबीनचे बियाणं उपलब्ध होत नाही तर दुसरीकडे DAP खताची कमतरता असल्याने बळीराजा अडचणी सापडला आहे. लातूर Latur हे राज्यातील सोयाबीनचा कोठार अशी ख्याती पण इथंच महाबीज सोयाबीन बियाणं व DAP खताची टंचाईच्या समस्येने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. Mahabeej seeds and fertilizers in the market in Latur ran out

लातूर जिल्हा हा सोयाबीन Soybeans उत्पादक जिल्हा अशी राज्यात लातूरची ओळख आहे. दरवर्षी साधारणपणे जिल्ह्यातील ६ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरले जात आहे. त्यानंतर ९० लाख हेक्टर तूर व अन्य पिकाचे उत्पादन घेतले जाते.

चालू वर्षी लातूर जिल्ह्यात २० हजार क्विंटल महाबीजचे सोयाबीन बियाणं विक्रीसाठी बाजारात आणले होते. पण आता महाबीजच बियाणं विकून संपलं आहे. तर दुसरीकडे सोयाबीनला DAP हे उत्तम खत असल्याने जिल्ह्यात ४५ लाख मेट्रिक टन खत उपलब्ध झाले होते. 

हे देखील पहा -

आता याचा साठा देखील संपला असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी सांगत आहेत. या सोबतच गावातील सोयाबीनच बियाणांची उगवण क्षमता तपासून बियाणं वापरा, तर खताच्या बाबतीत 18.18.10, 12.32.16 किंवा 20.20.10 ही संयुक्त खते वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com