उत्खननादरम्यान सापडला अश्मयुगीन काळातील खजिना

उत्खननादरम्यान सापडला अश्मयुगीन काळातील खजिना

चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित स्थळी उत्खननादरम्यान अश्मयुगीन काळातील खजिना सापडलाय. १० एकर जागेवर सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अश्मयुगीन मानवाचं वास्तव्यस्थळ सापडलंय. अश्मयुगीन काळातील सर्वात मोठं दगडी हत्यार निर्मितीचं हे केंद्र असावं असा अंदाज आहे. 

वैद्यकीय महाविद्यालयासाठी १०० एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. त्याचवेळी अमित भगत या पुरातत्व अभ्यासकाला या जमिनीवर एक मौल्यवान अश्मयुगीन खजिना सापडलाय. हत्यार निर्मिती केंद्राबद्दल हा शोध लागताच या स्थळाच्या माहितीचा एक विस्तृत अहवाल मुख्यमंत्र्यांच्या CMO कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय. 

WebTitle : maharashtra chandrapur stone age treasure found during excavation 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com