अमित शहांसोबत मुख्यमंत्र्यांची अर्धा तास चर्चा; काय असेल?

अमित शहांसोबत मुख्यमंत्र्यांची अर्धा तास चर्चा; काय असेल?


नवी दिल्ली : राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही.

मुख्यमंत्री फडणवीस हे आज सकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी एकटेच जाणून अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे समजू शकले नाही.

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तेच्या पेचप्रसंगात थेट पंतप्रधान मोदी किंवा भाजपचे अध्यक्ष अमित शहा हस्तक्षेप करून कोणता तोडगा काढू शकतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीच्या अनुषंगानेही चर्चा झाल्याची शक्यता आहे. केंद्रातून अधिक मदत मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.


Web Title: Maharashtra CM Fadnavis Meets Amit Shah

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com