CORONA BIG BREAKING | राज्यात कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ

CORONA BIG BREAKING | राज्यात कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ
MAHARASHTRA_CORONA

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे.  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 37वर गेली आहे. मुंबईत 3 तर नवी मुंबईत कोरोनाचा (COVID-19) 1 नवा रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली असल्याचं एकच खळबळ उडाली आहे. 

कालपर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 33 वर पोहोचला होता. दरम्यान, आज 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांना बरं करण्याचं आव्हान आता आरोग्य यंत्रणेसमोर उभं ठाकलंय. राज्यातील 37 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. पुण्यात सर्वाधिक म्हणजे 16 रुग्ण आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. देशात कोरोनाचे आतापर्यंत 116 रुग्ण सापडले आहेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 37 रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. मात्र लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनमार्फत करण्यात येत आहे. 

दरम्यान आता मुंबईत 8, नागपूरमध्ये चार कोरोनाबाधित सापडले आहेत. रायगडमध्ये 1, कल्याणमध्ये 1, अहमदनगरमध्ये एक रुग्ण आहे. यवतमाळमध्ये 2, ठाण्यात एक , नवी मुंबईत चार तर औरंगाबाद इथं प्रत्येकी 1 कोरोनाबाधित आतापर्यंत आढळला आहे. या सर्वांवर सध्या उपचार सुुरु आहेत. 

मुंबईत रविवारी एकही रुग्ण आढळून आला नव्हता. त्यामुळे हा दिलासा मानला जात होता. सुट्टी असल्यामुळे रविवारी अनेकजणांनी घरीच थांबणं पसंत केलं होतं. मात्र आज अनेकजण कामावर जाण्यासाठी बाहेर निघाल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, लोकलसोबत बस आणि ठिकठिकाणी काळजी घेतली जात आहे. प्रशासनाकडूनही खबरदारी बाळगण्यात येते आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी करण्यात आली आहे. तर शाळा-कॉलेजांनी 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

हेही पाहा - मुंबईनंतर आता पुण्यातही जमावबंदी होण्याची शक्यता

mumbai corona virus covid 19 maharashtra health india patient china people pune marathi news

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com