भारतात लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम

भारतात लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम
vaccine

मुंबई : कोरोना Corona प्रतिबंधात्मक लसीकरणात Vaccinaation केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र Maharashtra अव्वल स्थानी आहेच. सोबतच राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस Two Doses देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत Vaccination Program १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत. Maharashtra is the first state to give both doses of vaccine

दरम्यान, काल ५ मे रोजी महाराष्ट्रात १५८६ लसीकरण केंद्रांद्वारे एकूण २ लाख ५९ हजार ६८५ नागरिकांना कोरोना लसीचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये १ मे पासून सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात १८ ते ४४ वयोगटातील तब्बल १ लाख ५३ हजार ९६७ नागरिकांचा समावेश आहे.

हे देखील पहा -

राज्यामध्ये State आतापर्यंत १ कोटी ३९ लाख १५ हजार ८८ नागरिकांना लसीचा पहिला डोस First Dose देण्यात आलेला आहे. तर २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना कोरोनाचे लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. या नागरिकांचे लसीकरण आता पूर्ण झाले आहे. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव Additional Chief Secretary, Department of Health डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले कि, सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिलाच आहे. 

महाराष्ट्राने लसीकरणात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याच बरोबर लस वाया जाण्यामध्ये महाराष्ट्रात त्याचस प्रमाण केवळ १ टक्का One Percent इतकेच आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री CM आणि आरोग्यमंत्री Minister of Health यांच्याकडून अभिनंदन हि करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पाठोपाठ राजस्थान Rajasthan मध्ये १ कोटी ३५ लाख ९७ हजार, त्याबरोबरच गुजरात Gujrat मध्ये  १ कोटी ३२ लाख ३१ हजार, पश्चिम बंगाल West Bengal मधेही १ कोटी १४ लाख ७५ हजार, आणि कर्नाटक Karnatak राज्यात १ कोटी १ लाख ११ हजार इतके लसीकरण आतापर्यंत झालेले आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com