बारामतीत भाजप उमेदवरांसह सर्वच उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त 

बारामतीत भाजप उमेदवरांसह सर्वच उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त 

बारामतीत प्रामुख्याने भाजप उमेदवरांसह सर्वच उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे. त्यामुळे यातून एक सिद्ध हाेत आहे की, पवारांचा गडाला काेणीही सुरूंग लावू शकत  नाही.
बारामती शहर : गेल्या अनेक वर्षात बारामतीकरांनी जे प्रेम दाखवले आहे, ते प्रेम याही निवडणुकीत त्यांनी कायम ठेवले, मला विक्रमी मताधिक्‍याने विजयी करून बारामतीकरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून विकास काम अधिक वेगाने करण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी विजयानंतर दिली.
दरम्यान, बारामतीत प्रामुख्याने भाजप उमेदवरांसह सर्वच उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे. त्यामुळे यातून एक सिद्ध हाेत आहे की, पवारांचा गडाला काेणीही सुरूंग लावू शकत  नाही. भाजपने अनेकदा प्रयत्न करून देखील भाजपला पवारांचा गड भेदता आला नाही. बारामती मतदार संघातून गाेपीचंद पडळकर यांचा माेठा पराभव झाला आहे.      
एक लाखाहून अधिक मताधिक्‍य झाल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून जी परंपरा चालत आलेली आहे, तीच परंपरा बारामतीकरांनी कायम ठेवत मला सातव्यांदा विधानसभेत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदारांचे मी आभार व्यक्त करतो ,अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सातव्यांदा विधानसभेत जात असल्यामुळे माझ्यावरची जबाबदारी आता अधिक वाढलेली आहे , पुढील पाच वर्षामध्ये बारामतीची राहिलेली विकासकामे वेगाने मार्गी लावण्यास, सोबतच नवीन विकासाचे प्रकल्प बारामतीत आणण्याच्या दृष्टीकोनातून माझा स्वतःचा प्रयत्न असेल, असे अजित पवार म्हणाले.
उमेदवारी अर्ज भरतानाच एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता . त्याप्रमाणे बारामतीकरांनी ही त्यांच्या विश्वासाला साथ देत अजित पवार यांना एक लाखाहून अधिक मताधिक्‍य दिले.
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election pune baramti final result ncp ajiit Pawar won

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com