महात्मा फुले योजेनेचा 4000 कोरोना रुग्णांना लाभ

महात्मा फुले योजेनेचा 4000 कोरोना रुग्णांना लाभ
jalna

जालना जिल्ह्यात (Jalna District) आतापर्यंत ४ हजार कोरोना बाधित (Coronavirus) रुग्णांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana ) कोरोना आजारावर उपचार घेतले असून या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या विभागीय व्यवस्थापकांनी दिली आहे. आज फनींद्र चंद्र जालन्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली. ही योजना लागू असलेल्या हॉस्पिटलमध्ये रेशनकार्डचा आधार घेऊन या योजनेचा फायदा घ्यावा, कोणतेही शुल्क हॉस्पिटलकडे अदा करू नये असंही चंद्र यांनी स्पष्ट केलं.(Mahatma Phule Yojana benefits 4000 corona patients)

म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार घेण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील १३१ हॉस्पिटल निश्चित केले असून जालन्यातील दीपक हॉस्पिटल आणि हुसे हॉस्पिटलमध्ये  मोफत उपचार घेता येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे देखील पाहा

या आरोग्य योजनेचा लाभ कुणाला?
या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळे रेशनकार्ड धारक त्याचबरोबर अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना, केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील व्यक्ती हे लाभार्थी असतील. या योजनेत विशिष्ट्य जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यात औरंगाबाद व अमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शुभ्र रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

त्याचबरोबर शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com