घोड्यापेक्षा वेगाने पळतोय महेंद्रसिंग धोनी; साक्षीने शेयर केला व्हिडिओ

घोड्यापेक्षा वेगाने पळतोय महेंद्रसिंग धोनी; साक्षीने शेयर केला व्हिडिओ
M S Dhoni.jpg
;

आयपीएल 2020 IPL 2020  नंतर तहकूब झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा Chennai Super Kings  कर्णधार महेंद्रसिंग धोनी Mahendra Singh Dhoni सध्या रांची Ranchi येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवताना दिसत आहे. याचा नुकताच एक व्हिडिओ धोनीच्या पत्नीने साक्षी धोनीने Sakshi Dhoni इन्स्टाग्रामवर Instagram   शेयर केला आहे. यात धोनी आपला सर्व वेळ कुटुंबासाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी घालवताना दिसत आहे. ज्यामध्ये धोनी आपल्या पाळीव घोड्यासोबत शेटलँड पोनी Shetland Pony बरोबर रेस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धोनीच्या चाहत्यांनी या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.  (Mahendra Singh Dhoni is running faster than a horse;  Sakshi shared the video) 

- धोनीची चपळता पाहण्यासारखी 
महेंद्रसिंग धोनी Mahendra Singh Dhoni हा भारतीय संघातील Indian Cricket Team   तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक आहे. वयाच्या 39 व्या वर्षीही त्याचा फिटनेस जबरदस्त आहे. यांचा एक उत्तम नमूना साक्षीने शेयर केलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. धोनी आपल्या शेटलँड पोनी घोड्याबरोबर रेस करताना दिसत आहे आणि तो घोडीपेक्षा जास्त वेगाने पळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी काळ्या टी-शर्ट आणि लोअरमध्ये दिसत आहे. धोनीची पत्नी साक्षीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर  शेयर केला आहे. सोबतच या व्हिडीओला,  शक्तिशाली आणि वेगवान, अशी एक कॅप्शनदेखील दिली आहे.  काही तासांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चागंलाच व्हायरल झाला आणि  आतापर्यंत 4 लाख लोकांना पाहिला आहे.  धोनीचा जवळचा मित्र सुरेश रैनानेही यांनीही यावर  कमेंट दिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

- फार्महाऊसवर एका नव्या सदस्याचे आगमन 
अलीकडेच एमएस धोनीने यो पोनीला (एका विशिष्ट जातीचा घोडा) आपल्या मुलीला भेट दिली आहे. स्कॉटलंडचा शेटलँड पोनी जातीचा हा अतिशय सुंदर पांढरा रंगाचा घोडा आहे.  ज्याची किंमत लाखो रुपये आहे. काही दिवसांपूर्वी झिवाचा फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती प्रेमळपणे तिचे पोनी लाड करताना दिसत होती. 

- धोनीला घोड्यांची आवड 
गेल्या महिन्यात साक्षीने धोनीचा एक व्हिडिओ शेयर केला होता. यातही धोनी त्याच्या चेतक घोड्याला कुरवळताना आणि  त्याच्याबरोबर खेळताना दिसत होता.  धोनीच्या फार्महाऊस मध्ये घोड्यां व्यतिरुक्त इतरही अनेक प्राणी आहेत.  तथापी, आयपीएल 2021 पुढे ढकलल्यापासून धोनी रांचीमध्ये आहे. युएईमध्ये आयपीएल पुन्हा सुरू झाल्यावर सप्टेंबरमध्ये तो पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. 

Edited By- Anuradha Dhawade 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com