कल्याण तहसीलदारांची मोठी कारवाई; ढीगभर कोरी मतदान ओळखपत्र जप्त

कल्याण तहसीलदारांची मोठी कारवाई; ढीगभर कोरी मतदान ओळखपत्र जप्त
voting card

कल्याणमधील एका व्यक्तीच्या घरात कल्याण तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत एक दोन नव्हे तर 400 ते 500 कोरी मतदान ओळखपत्र सापडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित इसम कामेश मोरे यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेनंतर ही कार्ड कुठून आणली याचा उलगडा होऊ शकणार आहे. (Major action of Kalyan Tehsildar; Heaps of blank voting cards confiscated)

कल्याण पश्चिमेकडील माधव संसार गृहसंकुलातील एक सदनिका कामेश मोरे यांच्या नावावर असून पती पत्नीमध्ये वाद असल्याने या घरात त्यांची पत्नी आणि मुले राहतात. दोन दिवसांपूर्वी कामेश यांनी आपल्या मुलाना आपले कागदपत्र घेण्यासाठी येत असून आपल्या कपाटातून कागदपत्र काढून ठेवण्यासाठी फोन केला होता. यानंतर त्यांच्या पत्नीने त्याचे कपाट उघडले असता तिला कपाटात शेकडो मतदान ओळखपत्र सापडली मात्र ही ओळखपत्र कोरी असून या ओळखपत्राचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात येताच तिने या प्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांना संपर्क करत माहिती दिली.

हे देखील पाहा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदारांचे पथक घटना स्थळी पाठवले. त्यांना कपाटातील कागदामध्ये कोरी मतदान ओळखपत्र आणि राजकीय पक्षाचे नोंदणी फॉर्म सापडले याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणायत आला असून याप्रकरणाची खडकपाडा पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

Edited By : Pravin Dhamale 

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com