पुण्यात भर उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊसाच्या सरी, शेतीचे मोठे नुकसान

पुण्यात भर उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊसाच्या सरी, शेतीचे मोठे नुकसान
Major damage to agriculture due to rain shower in summer

राजगुरुनगर: उत्तर पुणे North pune जिल्ह्यात उन्हाळ्यात Summer पाऊसाळा Monsoon सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळत असुन मागील चार दिवसापासुन वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. याच दरम्यान काल सायंकाळपासुन पुण्याच्या खेड, शिरुर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह गारपिटीच्या पावसाने झोडपले. अचानक पडलेल्या या वादळी वाऱ्याच्या पावसाने बळीराजा शेतकऱ्याची Farmer चिंता मात्र वाढली आहे.  Major damage to agriculture due to rain shower in summer 

गारपिटीच्या Hail पावसाने कांदा, काढणीला आलेली बाजरी, पालेभाज्या यांसारख्या पिकांचे आणि जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र दुसरीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

उत्तर पुण्याच्या खेड आंबेगाव, जुन्नर, शिरुर, तालुक्यातील तीनमाही शेती केली जाते तरकारी भाजीपाला, ऊस तर उन्हाळी हंगामात धान्याची पिकं घेतली जातात. मात्र यंदा उन्हाळ्यातच पाऊसाचे वातावरण होऊन गारपिठ सुरु झाल्याने उभी पिकं सपाट झाली आहेत. तर फळबागा, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच पाऊसाच्या वातावरणामुळे पिकांवरील रोगराई वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. Major damage to agriculture due to rain shower in summer 

मागील वर्षभरापासुन लॉकडाऊनच्या संकटात आवकाळी पाऊसासह वादळाचे भिषण संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर उभं राहिलं आहे. शेतात काबाड कष्ट करत कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन पिकवलेली शेती काही क्षणात निस्तानाभुत होत आहे. त्यातच लॉकडाऊनचे संकट समोर उभे असल्याने शेतात पिकवलेला शेतमाल विकायचा कुठे असाही गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यावर उभा आहे. त्यामुळे मायबाप सरकारने कष्ठकरी बळीराजाला वेळीच मदतीचा हात द्यायला पाहिजे असे शेतकऱ्यांचे  म्हणणे आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com