धरणात पोहायला गेलेल्या मामाभाच्यांचा पाण्यात बुडून मृत्यु
Mama and niece drowned while swimming in Hatti Paul dam in Jalgaon

धरणात पोहायला गेलेल्या मामाभाच्यांचा पाण्यात बुडून मृत्यु

बुलढाणा : जळगाव जामोद Jalgaon Jamod तालुक्यातील धानोरा लघु प्रकल्पात Dhanora project (हत्ती पाऊल धरणात) मामा आणि दोन भाच्यांचा धरणात डूबुन करून अंत झाल्याची घटना आज (ता. 18) मे रोजी सकाळी 7 वाजता निदर्शनास आली आहे. सातपुडा Satpuda पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थ क्षेत्र धानोरा महासिध्द गावांवर या मृत्यूंमुळे शोककळा पसरली आहे. Mama and niece drowned while swimming in Hatti Paul dam in Jalgaon

काल दुपारी मामा भाचे तिघेजन धानोरा लघु प्रकल्पात पोहायला गेले होते. मात्र पोहताना Swimming धरणात बुडून त्यांचा मृत्यु झाला. विनायक गाडगे 17 , तेजस गाडगे 27 आणि नामदेव वानखडे वय 43 वर्षे असे तिघांची मृत पावलेल्याची नावे आहेत. हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले सध्या उन्हाळा Summer असल्याने ते पाण्यात पोहण्यासाठी गेले.

हे देखील पहा -

परंतु रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध शोध सुरू केली. सदर घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला दिली. धरणपरिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे आणि मोबाईल फोन पाण्याच्या काठावर आढळून आले. तो पर्यंत रात्र झाल्यानें अंधारात सदर मृतकांचा शोध लागला नाही. आज सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मृतदेह Dead body तरंगताना निदर्शनास आले. पाण्यात पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. Mama and niece drowned while swimming in Hatti Paul dam in Jalgaon

गावात सदर घटने बद्दल हळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन वाकडे एएसआय लक्ष्‍मण गव्हाळे करीत आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com