मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार

मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार
EWS RESERVATION

माजी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहे. त्यामुळे सध्याच्या ठाकरे सरकारवर मराठा समाज आणि विरोधी पक्ष ठीक करू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला आहे. न्यायालयाने आरक्षण नाकारल्यानंतर राज्यच्या मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या भेट घेऊन निवेदन दिले होते. त्याचबरोबर, खासदार संभाजी महाराज राज्य सरकार काहीच भूमिका घेत नसल्याचं कारण देत आक्रमक झाले आहेत, आणि त्यानी 6 जूनला आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.  (The Maratha community will be able to take advantage of the EWS reservation)

आज राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या आरक्षामुळे मराठा समाजातील तरुणांना राज्यातील विविध शैक्षणिक संस्थात 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहेत.

हे देखील पाहा

राज्य सरकारने त्या संबंधीचा जीआर काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.  राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता, तसा निर्णय आता राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता 10 टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळणार आहे. 

Edited By : Pravin Dhamale
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com