बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; सुप्रीम कोर्टाच्या निकालाची केली होळी..!

बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; सुप्रीम कोर्टाच्या निकालाची केली होळी..!
beed andolan

बीड - काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने  रद्द ठरवले आहे. Meeting of all organizations demanding Maratha reservationयावर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.  Maratha Kranti Morcha aggressive in Beed

त्यातच आता मराठा आरक्षणासंदर्भात Maratha Kranti Morcha सुप्रीम कोर्टाच्या Supreme Court  निकालाची होळी करत बीडमध्ये Beed मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा आमदार, खासदारांसह केंद्र आणि राज्य सरकार State Government विरोधात तीव्र संतापाच्या भावना व्यक्त करत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. येत्या काही दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर आता न्यायालयाच्या निकालाची होळी करू. पुन्हा आमदार आणि खासदाराची होळी करू असा संतप्त इशारा देखील बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

हे देखील पहा -

आज दुपारी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर, माने कॉम्प्लेक्स परिसरात एकत्रित येत केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध करत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भात दिलेल्या निकालाची प्रत देखील जाळण्यात आली. यामुळे बीडमध्ये आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. Maratha Kranti Morcha aggressive in Beed

दरम्यान काही दिवसांपूर्वी, सर्वोच्च न्यायालयात High Court आरक्षण रद्द झाल्याने पुढील भूमिका ठरवण्यासाठी  मराठा समन्वयकांनी बैठक घेतली होती. या बैठकी मध्ये आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघणार असून आता मराठा समाजाच्या नेत्यानाचं कोंडणार असल्याचा इशारा, मराठा समन्वयकांनी Maratha reservation दिला आहे. तर मराठा समाजाच्या आमदार आणि खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत.तर मराठा समाजातील नेत्यानाचं आता कोंडणार आहोत. असा संतप्त इशारा बीडमध्ये मराठा समन्वयकांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com