शहरे ‘थ्री स्टार’ करण्याचा मुख्यमंत्री यांचा निर्धार

शहरे ‘थ्री स्टार’ करण्याचा मुख्यमंत्री यांचा निर्धार

मुंबई - लोकसहभाग व सवयी बदलल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये परिवर्तन घडले आणि महाराष्ट्राने देशात सर्वाधिक पुरस्कार मिळविले आहेत. सन २०२० च्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातील २०० शहरे ‘थ्री स्टार’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच जी शहरे थ्री स्टार होतील, त्या शहरांना विविध योजनासाठी निधी वितरणात प्राधान्य देण्यात येईल. तसेच, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना ५०० कोटी रुपयांची पारितोषिके देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ व २०१९ मध्ये देशपातळीवर सर्वोत्तम कामगिरी केलेल्या महानगरपालिका व  नगरपालिकांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. या वेळी सन २०१८ व २०१९ च्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या राज्यातील ३९ स्थानिक स्वराज्य संस्थांचा गौरव या वेळी करण्यात आला. नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी हा गौरव स्वीकारला. 

फडणवीस म्हणाले, की नगरपालिका आणि नागरिकांनी घेतलेल्या सहकार्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ व २०१९ मध्ये सर्वाधिक पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. लोकांच्या सवयी बदलेपर्यंत परिवर्तन होऊ शकणार नाही. लोकांचा सहभाग व सवयी बदलल्या, तर खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण होईल. गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात ५३ शहरांना थ्री स्टार मिळाले आहेत. त्यापैकी २७ शहरे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

आतापर्यंत स्वच्छ सर्वेक्षणात मागे असलेल्या, परंतु सन २०२०मध्ये सर्वेक्षणाच्या मानांकनात मोठी मजल  (हायेस्ट जंप) मारणाऱ्या शहरांनाही मोठ्या प्रमाणात पुरस्कार देण्यात येतील. स्वच्छ भारत अभियानात राज्यातील नागरी भाग हा क्रांतिकारी कार्य करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

Web Title: Clean City Three Star Devendra Fadnavis

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com