आयुष्सामानने घातला साधा कुर्ता, पायजामा, बिग बींच्या बाजूला उभा राहिला आयुष्मान 

आयुष्सामानने घातला साधा कुर्ता, पायजामा, बिग बींच्या बाजूला उभा राहिला आयुष्मान 

याचवर्षी मे महिन्यात आयुष्मान खुरानाने घोषणा केली होती की तो दिग्दर्शक सूजीत सरकार बत दुसरा सिनेमा करत आहे. त्याने सांगीतलं होतं की चित्रपटाचं नाव गुलाबो सिताबो असून या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चनसोबत तो स्क्रिन शेयर करेल.

गुलाबो सिताबो चित्रपटातील बिग बींचे फोटो चांगलेच चर्चेत आले होते. त्यांचे या चित्रपटातील फोटो पाहून त्यांना ओळखणही कठिण जात होतं. एका वेगळ्या लूकसह बिग बी या सिनेमात दिसतील. त्यातच आता या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकत असणाऱ्या आयुष्मानचा लूकही समोर आलाय. आयुष्मान या लूकमध्ये साधा कुर्ता आणि पायजामा घातलेला दिसतोय. त्याच्या हातात एक बॅगही दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांनी हिरव्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजामा परिधान केला आहे. बिग बींची मोठी पांढरी दाढीही यात दिसत आहे.
अंधाधुन चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आयुषमान खुराना आता हिंदी सिनेसृष्टीतला आघाडीचा नायक ठरलाय. आणि आता अमिताभ बच्चनसोबत स्क्रिन शेयर करताना आयुष्मान दिसेल. चित्रपटाचं चित्रीकरण लखनऊमध्ये झाल आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात एक खानदानी नवाबाच्या भूमिकेत दिसतील, ज्यांच्या हवेलीत आयुष्मान भाडोत्रीच्या रुपात राहायला येतो. चित्रपटाची कहाणी घर मालक आणि भाडोत्री या दोघांभोवती फिरणारी आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन सूजीत सरकार यांनी केलं असून. जुही चर्तुवेदी यांनी लेखन केलं आहे. हा चित्रपट 28 फ्रेबुवारी 2020 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आयुष्मान आणि सूजीत सरकार एकत्र काम करताना दिसतील. आयुष्मानचा डेब्यू चित्रपटही सूजीत सरकारनेच दिग्दर्शित केला होता, तो सिनेमा म्हणजे विक्की डोनर. 2012मध्ये रिलीज झालेल्या आयुष्मानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला यश मिळालं होतं.

Web Title : ayushmann khurrana and amitabh bachchan Look For Gulabo Sitabo movie 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com