वर्षा गायकवाड राज्याच्या पहिल्याच महिला शिक्षण मंत्री

वर्षा गायकवाड राज्याच्या पहिल्याच महिला शिक्षण मंत्री

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडील खातेवाटप आज (रविवार) जाहीर झाले असून, राज्याला पहिल्यांदाच एका महिलेकडे शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आले आहे. हे खाते मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची कन्या वर्षा गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा अनुभव त्यांच्याकडे पूर्वीपासूनच आहे. आता त्यांच्याकडे हे पद आल्याने महाराष्ट्राला पहिल्या महिला शालेय शिक्षणमंत्री मिळाल्या आहे. 

वर्षा गायकवाड म्हणाल्या, की खातेवाटपात शालेय शिक्षणमंत्रीपदासारखी मोठी जबाबदारी दिल्याने मी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानते. शालेय शिक्षण खाते मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. शिक्षण हा खूप महत्त्वाचा विभाग आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी काम करायचे आहे. चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षण खात्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात येतील.  

Web Title: Congress MLA Varsha Gaikwad gets education ministry in Maharashtra government

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com