हनिमूनच्या तयारीत असताना पतीला मिळाली पत्नीची अश्लिल क्लिप... आणि...

हनिमूनच्या तयारीत असताना पतीला मिळाली पत्नीची अश्लिल क्लिप... आणि...

बंगळूरु : लग्नाबद्दलच्या संकल्पना आता बदलत चालल्यात. त्यातच एका धक्कादायक बातमी समोर आलीय. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबतचा अश्लिल व्हिडीओ तिच्या पतीला पाठवला आणि हे प्रकरण थेट पोलिसांत गेलं. 

विवाह झाल्यानंतर हनिमूनच्या तयारीमध्ये असताना पतीला पत्नीची अश्लिल क्लिप मिळाली. यामुळे प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर प्रियकराला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सुब्रमण्यमनगर भागामध्ये राहात असेल्या युवकाचे चिकमंगळूर येथील युवतीसोबत विवाह ठरला होता. युवक खासगी कंपनीत काम करत असून, युवती सरकारी नोकरी करत आहे. विवाह ठरल्यानंतर दोघांचा विवाह पार पडला. विवाह झाल्यानंतर दोघे हनिमूनची तयारी करत होते. पण, युवतीच्या मोबाईलवर एक अश्लिल मेसेज आला. युवकाने त्या मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी दुसऱा क्रमांकावरील व्यक्तीने आपण तिचा प्रियकर असल्याचे सांगितले. शिवाय, दोघांचे अश्लिल व्हिडिओ पाठवले. तुमचा विवाह ठरल्यानंतरही आमच्यात शारिरीक संबंध आल्याचे त्याने सांगितले. यामुळे युवकाने कुटुंबियांना याबाबतची माहिती देऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर प्रियकराने सांगितले की, 'आम्ही गेल्या सात वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात असून, आमच्यात अनेकदा शारिरीक संबंध आले आहेत. प्रेयसीचा विवाह ठरल्यानंतरही आमच्यात शारिरीक संबंध होते.'

दरम्यान, युवतीचे शोषण केल्याच्या कारणावरून प्रियकराला ताब्यात घेण्यात आले आहे. विवाह मोडण्याच्या भितीने युवतीने आत्महत्येची धमकी दिली आहे.

Web Title: man gets pornographic video of his wife before honeymoon

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com