रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंना ही मंत्रिपदं
Web Title: Rohit pawar and Aditya Thackeray may state minister in Maharashtra Government

रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंना ही मंत्रिपदं

मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झालेले असताना आता कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार? मंत्रिपदावर कोणा-कोणाची वर्णी लागणार या चर्चांना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार रोहित पवार आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.

रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महत्वाचे नेते आहेत. परंतु, त्यांची पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना राकीय अनुभव कमी असला तरी अनुभवासाठी राज्यमंत्री पदे देण्यात येणार असल्याचे माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे.

आज विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. बबनराव पाचपुते यांच्यापासून शपथविधीला सुरवात करण्यात आली होती. यामध्ये रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांनीही आमदारकीची शपथ घेतली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतच सर्व आमदारांना आज गोपनियतेची शपथ देण्यात आली.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे  २८ नोव्हेंबर म्हणजे उद्या सायंकाळी ५ : ३० वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी हा शितीर्थावर होणार असल्याचीही माहिती देण्यात आली असून त्यांच्यासोबत नऊ मंत्रीही शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Rohit pawar and Aditya Thackeray may state minister in Maharashtra Government

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com