अबब! एका रात्रीत 500 कोंबड्या फस्त केल्या...

अबब! एका रात्रीत 500 कोंबड्या फस्त केल्या...

पुणे : बोरिपार्धी (ता. दौंड) येथे प्रतीक पोल्ट्री फार्मवर बिबट्याने रात्री हल्ला करीत सुमारे पाचशे कोंबड्यांना फस्त केल्या आहेत. हा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. 

दरम्यान, पोल्ट्रीला एका कोपऱ्यात कमकुवत जाळी होती, त्या ठिकाणावरुन बिबट्या आत गेला आणि तेथूनच तो बाहेर पडला. पोल्ट्रीचे मालक दिलीप टेंगले सकाळी पोल्ट्रीवर आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला.

दरम्यान, वनपाल सय्यद यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, शेतातील ठसे बिबट्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

Web Title: A leopard ate 500 hens in a night in Pune

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com