काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहीरनामा

काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहीरनामा

मुंबई भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षाच्या सत्तेत महाराष्ट्राची आर्थिक अधोगती झाली असून, राज्याची स्थिती चिंताजनक बनल्याचे लेखोजोखा महाआघाडीने जाहिरनाम्यात मांडला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारशी तुलना करताना मागील पाच वर्षांतील वित्तीय स्थिती खालावली आहे. असे स्पष्ट करताना माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आकडेवारी सादर केली.

युती सरकारच्या काळात राज्याची अधोगती
आघाडी सरकाच्या काळात आर्थव्यस्थेचा वृध्दीदर 13 टक्के होता तो घसरून 10.4 टक्के झाला आहे. सरकारने 32 हजार रोजगार भरतीची घोषणा केली मात्र त्यासाठी 32 लाख बेरोजगारांनी अर्ज दाखल केले. यावरून राज्यातील बेरोजगारीनं उच्चांक गाठल्याचे जयंत पाटील व बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. आघाडी सरकारच्या काळात राज्याची महसुली दरवाढ 18 टक्के होती. त्यामधे युती सरकारच्या काळात 11 टक्के इतकी घसरण झाली आहे.  आघाडी सरकारच्या काळात कर उत्पन्न 19.5  टक्के इतका होता. तो मागील पाच वर्षात कर वसुली 8.25  टक्के इतका खाली आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शपथनामामधील ठळक घोषणा

  1. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देणार
  2. तरूण सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजार रूपये भत्ता
  3. उच्च शिक्षणासाठी शुन्य टक्के व्याजदराने कर्ज
  4. कामगारांना किमान 21 हजार वेतन
  5. महिला गृह उद्योगाच्या विक्री उत्पादनाला जीएसटी पुर्णपणे माफ करणार
  6. दिव्यांगाना बीपीएल च्या सवलती देणार


Web Title: vidhan sabha 2019 congress ncp manifesto mumbai jayant patil balasaheb thorat

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com