Video: नवरदेव 103 तर नवरी 23 वर्षांची...

Video: नवरदेव 103 तर नवरी 23 वर्षांची...

जर्काता (इंडोनेशिया): एक अजब प्रकार समोर आला आहे. 103 वर्षाच्या नवरदेवाने 23 वर्षांच्या नवरीसोबत लग्न केलं आहे. या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांच्या वयामध्ये तब्बल 80 वर्षांचे अंतर आहे. या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

आपण नेहमी आपल्या वयाच्या मुलीशी अथवा आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलीशी लग्न करतो. पण इंडोनेशियातील एका 103 वर्षांच्या व्यक्तीने याला फाटा दिलाय. इंडोनेशियाच्या या नवरदेवाने चक्क 23 वर्षांच्या नवरीबरोबर लग्न केलंय. या लग्नाचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. पुआंग कट्टे आणि इंडो अलंग असं या नवरा-नवरीचं नाव आहे. 

या दोघांनी एकमेकांच्या संमतीनं हे लग्न केलं असल्याची माहिती मिळाली आहे. हे लग्न जरी दोघांच्या संमतीनं झालं असलं, तरी हे लग्न केल्यानं या दोघांवर टीका करण्यात येत आहे. हुंडा देवून लग्न केलं असल्याचं पुआंग यांनी सांगितलंय. सध्या दोघेही इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेशी प्रांतात पुआंगच्या घरी राहत असल्याची माहिती आहे. दरम्यान लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Web Tilte 103 Year Old Man Married 23 Year Old Lady In Indonesia

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com