श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट; दोन दहशतवाद्यांसह 15 ठार

श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट; दोन दहशतवाद्यांसह 15 ठार

कोलंबो : श्रीलंकेमध्ये गेल्या रविवारी (ता. 21) झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटानंतर शुक्रवारी (ता. 26) मध्यरात्री पुन्हा तीन बॉम्बस्फोट झाले. यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांसह 15 ठार झाले आहेत, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने आज (शनिवार) दिली.

श्रीलंका रविवारी झालेल्या स्फोटांनी हादरली असून, सहा दिवसांनी पुन्हा बॉम्बस्फोट झाले आहेत. श्रीलंकेच्या पूर्व प्रांतातल्या अंबारईत तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत 15 जण ठार झाले असून, यामध्ये सहा मुलांचा समावेश आहे. अंबारईच्या साइंदमरदू भागात काही जणांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी दिली. एका संशयिताने कलमुनाईत एका इमारतीत बॉम्बस्फोट घडवला.

साइंदमरदूमध्ये सुरक्षा दलावर गोळीबार झाल्यानंतर, बॉम्बस्फोटाच्या आवाजाने परिसर हादरल्यानंतर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांचा प्रमुख सूत्रधार असलेल्या जहरान हाशिमच्या कट्टाकुंडी गावातील प्रत्येक घरात जाऊन पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी तपासादरम्यान बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी स्फोटके ताब्यात घेतली. यावेळी पोलिसांना इसिसचा बॅनर आणि कपडे मिळाली असून, या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तीन बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पहाटे 4 पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

ही कारवाई कोलंबोपासून 325 किमी दूर असलेल्या समंथुरईमध्ये करण्यात आली आहे. श्रीलंकेने 10 हजार जवान या शोधमोहिमोसाठी तैनात केले आहेत. दरम्यान, ईस्टर संडेला चर्च आणि हॉटेलबाहेर 8 बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 321 जण ठार झाले होते.

Web Title: 15 killed in Sri Lanka shootout

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com