गुप्त माहिती उघड झाली आणि घात झाला..

गुप्त माहिती उघड झाली आणि घात झाला..

गडचिरोली: गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 15 जवानांसह एक चालक शहीद झाला. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीमधील लोकल एरिया कमिटीने हा हल्ला घडवून आणला आहे. यासाठी आयडीचा वापर केल्याचे समजते. 

जवानांच्या हालचालीची माहिती उघड झाल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ही गुप्त माहिती कशी उघड झाली त्याचा शोध घेऊ असे हे ते म्हणाले. ही माहिती उघड झाल्यानेच गडचिरोली जिल्ह्यात हा हल्ला झाला असून यामुळेच हा घात झाला. 

महाराष्ट्र दिनीच दिवशीच गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूळखेडा गावाजवळील ही घटना घडली. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे. 

गेल्या वर्षी 25 एप्रिल रोजी जवानांच्या कारवाईत 40 नक्षलवादी ठार झाले होते. या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होण्याआधी हा हल्ला घडवण्यात आला आहे. त्याच बरोबर काही दिवासांपूर्वी याच परिसरात झालेल्या चकमकीत एक महिला कमांडर ठार झाली होती. आज झालेला हल्ल्यामागे या दोन घटनांचा संबंध जोडला जात आहे.

Web Title: 16 Commandos killed In cowardly Naxal attack at Gadchiroli

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com