धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर लोटला भीमसागर

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर लोटला भीमसागर

62 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर भीमसागर लोटला आहे. दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून भव्य स्तुपात ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे अनुयायीच दर्शन घेत आहेत.

14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरात लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेंव्हापासून आजतागत देशभरातुन लाखो बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. 

दिवसभर दीक्षाभूमी परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com