छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातांबद्दल अबू आझमींचं मोठं वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातांबद्दल अबू आझमींचं मोठं वक्तव्य

मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज (बुधवार) विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि संभाजी महाराज यांच्याबाबत मोठी वक्तव्ये केली आहेत. त्यांनी नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

आज विधानसभेत बोलताना त्यांनी सुरवातच 'शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा देऊन केली. ते पुढे म्हणाले की, ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने पूर्ण महाराष्ट्र ओळखला जातो, ते आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच मी सरकारकडे मागणी करतो की, नवी मुंबईचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवण्यात यावे.

पुढे ते म्हणाले की, स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांना पूर्णपणे तयार करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या नावावरून ठाणे शहराचे नाव बदलून जिजामाता नगर असे करण्यात यावे. तसेच, पुणे शहराचे नाव बदलून शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवणारे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून नाव देण्यात यावे. संपूर्ण विधानभवनही या माझ्या मागण्याचे समर्थन करेल अशी मला आशा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com