VIDEO | राज्यसभेत उदयनराजेंनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केल्यानं उपराष्ट्रपती भडकले!

VIDEO | राज्यसभेत उदयनराजेंनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केल्यानं उपराष्ट्रपती भडकले!

काल उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला. यावरुन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूंनी उदयनराजेंना तंबी दिली. यावरुन सोशल मीडियातून जोरदार टीका केली जातेय. शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा करण्यावरुन नवा वादंग उसळळाय. उदयनराजेंनी काल खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीत शपथ घेऊन झाल्यानंतर त्यांनी जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली. यावरुन उपराष्ट्रपती यांनी उदयनराजेंना घोषणा देण्यावरुन सुनावलं. राज्यसभा हे चेंबर नसून सभागृह आहे. कोणत्याही प्रकारची घोषणा माझ्या सभागृहात चालणार नाही, असं उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी म्हटलंय. यावरुन सोशल मीडियावर शिवप्रेमींनी उपराष्ट्रपतींवर जोरदार टीका केली आहे. 

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज दिल्लीत पार पडला. कोरोनामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, राजीव सातव आणि भागवत कराड यांच्यासहित उदयनराजे भोसले यांनीदेखील खासदारकीची शपथ घेतली.

काय म्हणाले व्यंकय्या नायडू? 

नायडू म्हणाले हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे, हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही आहे. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. दरम्यान हे चित्रण खूद्ध खासदार उदयनराजे भाेसले यांच्या ट्विटमध्ये आढळते.

यापूर्वी सुद्धा अनेकवेळा शपथविधी सोहळ्यात खासदारांनी अशा प्रकारे अन्य घोषणा दिल्याने वाद झाले आहेत. गतवर्षी लोकसभा सदस्यपदाची शपथ घेताना काही खासदारांनी धार्मिक घोषणा दिल्या होत्या. तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातही काही आमदारांनी घोषणा देत शपथ घेतल्याने वाद निर्माण झाला होता. या एकूण पार्श्वभूमीवर व्यंकय्या नायडू यांची आजची प्रतिक्रिया आहे. 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com