भाजपला दणका, विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती लांबणीवर

भाजपला दणका, विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती लांबणीवर

मुंबई : भाजप सेनेची युती तुटल्यापासून अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. कधी बहुमत मिळत नाही, तर कधी राष्ट्रपती राजवट लागते. तर कधी वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात. असो, मात्र या सगळ्यामुळे भाजपचं धाबं चांगलंच दणाणलंय. एका रात्रीत मुख्यमंत्री झालेले आणि आणि 72 तासांत सत्ता संपलेले फडणवीस चांगलेच हादरले आहेत.

महाविकास आघाडीने भाजपला दणका दिलाय. विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती आता लांबणीवर पडली आहे. महाविकासआघाडीकडून नवी रणनीती आखली जात आहे. देवेंद्र फडनवीसांची कोंडी करण्याचा महाविकासआघाडीचा प्रयत्न आहे. आज विरोधी पक्ष नेत्याची निवड होणार नाही आहे. विरोधी पक्षनेत्याची निवड कामकाजातून वगळण्याच आली आहे. देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवण्याची रणनीती असल्याचं बोलंल जातंय. देवेंद्र फडणवीस यांनी  ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली ती पाहता विरोधी पक्षाची नियुक्ती लवकर न करण्याची महाविकासआघाडीची रणनीती असल्याचं सांगण्यात येतंय. विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशन होणार अशीच चिन्हं आहेत. 

Web Title - Appointment of opposition leader will be late 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com