ऑनलाईन व्यवहार करत असाल तर ही बातमी वाचाच! OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास

ऑनलाईन व्यवहार करत असाल तर ही बातमी वाचाच! OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास

सावधान! तुमचे पैसे बँकेतही सुरक्षित नाहीयेत. वेळ वाचवण्यासाठी तुम्ही जर ऑनलाईन व्यवहार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, OTP शिवायही बँक खात्यातील पैसे लंपास होतायत. ऑनलाईन व्यवहार करताना आपला ओटीपी, पासवर्ड कोणालाही सांगू नका असे खबरदारीचे मेसेज बँकांकडून येत असतात. तरीदेखील भामटे शक्कल लढवून लोकांना जाळ्यात अडकवत असल्याची माहिती समोर आलीय. पण, ऑनलाईन फसवणुकीपासून सावधगिरी बाळगायची असेल तर काय सावधगिरी बाळगायला हवी. 

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध व्हा! या गोष्टींची काळजी घ्या! 

  • इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरताना काळजी घेतली पाहिजे
  • कोणालाही कधीही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील देऊ नये
  • सार्वजनिक वाय-फाय किंवा इंटरनेट नेटवर्कद्वारे कधीही बँकिंग व्यवहार करू नका
  • बँकिंग खाते नेहमी मोबाईल नंबरसह अपडेट करा
  • डेबिट कार्डचा सीव्हीव्ही नंबर किंवा पिन सारख्या गोष्टींचा तपशील मोबाईलमध्ये ठेवू नये

आपण पेमेंट ऍप वापरत असल्यास, सावधगिरी बाळगा. पेमेंट ऍपला जास्त अधिकार देऊ नका. ऑनलाईन व्यवहारासाठी वेगळं अकाऊंट ठेवणं चांगलं. त्यामध्ये चार किंवा पाच हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम ठेवू नये. आपलं मुख्य बँक अकाऊंट इंटरनेटशी जोडू नका. एवढी जरी काळजी घेतलात तरी तुमच्या अकाऊंटमधील पैसे सुरक्षित राहू शकतील असं सांगितलं जातंय.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com