रविना टंडन, फराह खान आणि भारती सिंग यांच्याविराेधात बीडमध्ये गुन्हा दाखल

रविना टंडन, फराह खान आणि भारती सिंग यांच्याविराेधात बीडमध्ये गुन्हा दाखल

बीड- धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी बीड येथील पोलिस ठाण्यात तीन अभिनेत्रींविरोधात शनिवारी (ता. 28) गुन्हा नोंद झाला आहे.

सिनेअभिनेत्री रवीना टंडन, विनोदी कलावंत भारती सिंग आणि चित्रपट निर्माती फराह खान अशी या कलावंतांची नावे आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

"बॅक बेंचर्स' या कार्यक्रमात एका धार्मिक ग्रंथातील पवित्र शब्दाचा चुकीचा उच्चार केल्याची तक्रार आशिष शिंदे यांनी दिली होती. त्यावरून बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करुन मालाड (मुंबई) ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला.

Web Title: Crime in Beed Against Three Actresses
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com