इन्स्टंट न्यूडल्स खाताय सावधान! न्यूडल्स आरोग्यासाठी घातक

इन्स्टंट न्यूडल्स खाताय सावधान! न्यूडल्स आरोग्यासाठी घातक

जकार्ता : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चविष्ट आणि पटकन तयार होणारे न्यूडल्स आवडतात. भूक लागल्यावर पटकन आणि सोप्या पद्धतीने तयार करता येणारे न्यूडल्स पालकही मुलांना देताना कोणता विचार करत नाहीत. मात्र हेच न्यूडल्स मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे एका आरोग्य अहवालातून समोर आले आहे. या न्यूडल्समुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याच तज्ज्ञांचे म्हणणे असून दक्षिण आशियातील लाखो मुलांचे आरोग्य या इन्स्टंट नुडल्समुळे बिघडत असल्याचे समोर आले आहे.

युनिसेफने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात नाश्त्याच्या वेळी अनेक पालक मुलांना न्यूडल्स देतात. पटकन तयार होणारे हे न्यूडल्स मुलांनाही आवडतात. परिणामी फळे आणि भाज्या मुले खात नसल्याने पोषक घटक त्यांना मिळत नाहीत. विशेषत: दक्षिण आशियातील फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांतील पाच वर्ष आणि त्याखालील वयोगटातील सरासरी ४० टक्के मुलांचे आरोग्य या इन्स्टंट नुडल्समुळे बिघडत आहे.
 
“न्यूडल्स खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. न्यूडल्समध्ये सोड्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मुलांनी थोडे जरी न्यूडल्स खाल्ले की त्यांचे पोट भरतं आणि त्यांना भूक लागत नाही. याशिवाय बहुतांशी न्यूडल्स हे मैद्याचे बनवलेले असतात आणि मैदा पचायला जड असल्याने तो आतड्यांसाठी ही हानिकारक ठरतो.”असे एशिया युनिसेफच्या पोषण तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Web Title: Beware of instant noodles

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com