VIDEO | 10वी पास झालेल्यांसाठी बक्कळ पगाराच्या नोकरीची संधी

VIDEO | 10वी पास झालेल्यांसाठी बक्कळ पगाराच्या नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकारनं नोकरीची संधी उपलब्ध करून दिलीय.तीही ऐन मंदीत. दहावी पास उमेदवारांसाठी डीआरडीओ तब्बल 1817 जागा भरत आहे.

तुम्ही दहावी पास केलीय का. तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का. मग केंद्र सरकारनं तुमच्यासाठी नोकरीची एक संधी आणलीय. डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत तब्बल 1817 पदांवर भरती केली जाणाराय.ही पदं भरण्यासाठी डीआरडीओनं अर्जही मागवले .मल्टी टास्किंग स्टाफसाठी ही भरती  होणाराय. मान्यताप्राप्त संस्थेकडून दहावी पास केलेले विद्यार्थी या जागांसाठी अर्ज करू शकतात .सामान्य, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना अर्जाची फी म्हणून 100 रु. तर एससी, एसटी उमेदवारांसाठी काहीही शुल्क नसेल. या पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 तर कमाल वयोमर्यादा 20 आहे. आरक्षित विभागातील उमेदवारांना त्यात सवलत आहे. या जागांसाठी 23 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्यास सरुवात झालीय. 23 जानेवारीपर्यंत हे अर्ज करता येतील.
तेव्हा तुमच्यासाठी एक संधी चालून आलीय. लवकरात लवकर कागदपत्र शोधा आणि या पदांसाठी अर्ज करा.

Web Title -  big payment job for 10th pass students

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com