नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव, फडणवीसांना मोठा धक्का

नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव, फडणवीसांना मोठा धक्का

नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला जोरदार धक्का बसलाय. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 30 जागा मिळाल्यात, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागांवर विजय मिळालाय. भाजपला मात्र 15 जागांवर समाधान मानावं लागलंय, तर शिवसेनेला अवघी एकच जागा मिळालीय.

अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची उत्सुकता होती. मात्र यात सर्वांच्याच प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बरेच प्रयत्न केले होत्. मात्र तरीही भाजपला या ठिकाणी मोठी हार पत्कारावी लागली आहे. 

खरंतर नागपूर हा फडणवीस आणि नितीन गडकरींचा गड मानला जातो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या गावात तर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. तर चंद्रशेखर  बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

Web Title - bjp lose in ZP Election of nagpur

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com