भाजपची शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची नवी ऑफर!

भाजपची शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची नवी ऑफर!
bjp's new offer to shivsena 

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये पुन्हा भाजपने नवी खेळी केली आहे. महाशिवआघाडीचं सरकार राज्यात येणार असं चित्र स्पष्ट होऊ लागल्यानंतर, भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी अखेरचा जोर लावण्यास सुरुवात केलीय. आधी शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास नकार देणाऱ्या भाजपने. आता तर थेट 5 वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर, शिवसेनेला देऊ केलीय. या नव्या ऑफऱसंदर्भातला प्रस्तावच मातोश्रीकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलीय. मात्र जेव्हा वेळ होती तेव्हा टाळाटाळ करणाऱ्या भाजपच्या या प्रस्तावाकडे, शिवसेनेने पाठ फिरवल्याची माहिती समोर आलीय. मातोश्रीहून भाजपच्या या प्रस्तावाला काहीच प्रतिसाद मिळाला नसून, भाजपच्या पुन्हा सत्तास्थापनेच्या आशा जवळपास संपुष्टात आल्याचं मानलं जातंय. 

Web Title - bjp's new offer to shivsena 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com