CBSC चा बारावीचा निकाल जाहीर.. 

CBSC चा बारावीचा निकाल जाहीर.. 

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल 83.4 टक्के लागला आहे. मुझफ्फरनगरची करिश्मा अरोरा आणि हंसिका शुक्ला 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा निकालात वाढ झाली असून चेन्नई विभागाचा निकाल सर्वाधिक आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज 2019चा बारावीचा निकाल जाहीर केला आहे. 83.4 टक्के असा एकुण निकाल लागला असून मुली 88.70 टक्के आणि मुले 79.4 टक्के असा निकाल लागला असल्याची माहिती सीबीएसई बोर्डाने जाहीर केली आहे. सर्व झोनचे निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात आले आहे.  

विद्यार्थ्यांनी कुठे बघावा निकाल? ​
- बोर्डची अधिकृत वेबसाइट http://cbseresults.nic.in आणि http://cbse.nic.in वर जा. 
- 'Click for CBSE Results' लिंकवर क्लिक करा.
- CBSE results सेक्शनमध्ये 'CBSE Class 12 results' लिंकवर क्लिक करा.
- आपला रोल नंबर व अन्य माहिती भरा.

WebTitle : marathi news cbsc results declared check your result 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com