पंकजा, खडसे आणि पाटलांमध्ये बंददाराआड चर्चा! का भडकले चंद्रकांत पाटील?

पंकजा, खडसे आणि पाटलांमध्ये बंददाराआड चर्चा! का भडकले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडेमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. दोघांसह एकनाथ खडसे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरु आहे.  कदाचित चंद्रकांत पाटलांकडून पंकजांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जातायत की काय अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. आता पंकजा मुंडे आणि खडसे काय निर्णय घेतात हे कळेलच, मात्र आता त्यांच्यात नेमकी काय चर्चा सुरुय हे कळू शकलं नाही. 

याआधी राजकीय चर्चांवरुन चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कुणीही नाराज नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. भाजपमधील नेते नाराज असल्याचं वृत्त हे मनाचे खेळ असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. गोपीनाथ गडावर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. आज पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर मेळावा घेत आहेत. या मेळाव्याला एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, महादेव जानकर यांसारखे ज्येष्ठ नेते उपस्थित आहे. जे पी नड्डा देखील या मेळाव्याला येणार असल्याची चर्चा होती. मात्र जेपी नड्डा हे मेळाव्याला येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. थोड्याच वेळात पंकजा या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपिनाथ गडावरून पंकजा नेमकी काय भूमिका मांडणार,याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 

दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावर आपली पुढली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी आता कार्यकर्ते जमू लागलेत. काही कार्यकर्त्यांनी पोवाडा सादर केलाय. गोपीनाथ गडावर तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मेळाव्यात पंकजा मुंडेंची राजकीय भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ओबीसी समाजाची मोट बांधण्यात त्या यशस्वी ठरणार का, हे देखील स्पष्ट होईल. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे यांनी मेळवा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने त्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.

Web Title - Chandrakanat patil angry on pankaja munde's quastion

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com