कोरानाचा धोका ऑगस्टपर्यंत, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले पाहा...

कोरानाचा धोका ऑगस्टपर्यंत, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले पाहा...

वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोना व्हायरसचा उद्रेक वाढत असतानाच ‘कोरोना’चा धोका ऑगस्टपर्यंत कायम राहण्याची शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्यक्त केली.

‘आपण योग्य काळजी घेतली, तर देशातील मृतांची संख्या नक्कीच कमी होईल, असे मला वाटते. पण, लोक जुलै-ऑगस्टपर्यंतची चर्चा करीत आहेत. त्यांचे म्हणणे मला योग्य वाटते. कोरोना व्हायरसचे निर्मूलन होण्यासाठी एवढा काळ लागेल, असे मला वाटते,’’ असे ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमधील पत्रकार परिषदेत सांगितले. या विषाणूचे संक्रमण आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकला अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडायची असून, कठोरपणे प्रयत्न करायचे आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटरनी ७५० अब्ज डॉलरचा प्रस्ताव दाखल केला आहे. यात रुग्णालयाची क्षमता वाढविणे, बेरोजगार विमा आणि अमेरिकेचे नागरिक, उद्योग आणि आरोग्य क्षेत्रासाठी थेट मदतीची मागणीही त्यांनी केली आहे. कोरोना व्हायरसचा फटका अमेरिकेच्या विमान कंपन्यांनाही बसला असून, त्यांनी सरकारकडे ५० अब्ज डॉलरची मदत मागितली आहे. अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी विमान कंपन्यांना मिळालेल्या मदतीपेक्षा ही मागणी खूप जास्त आहे, असे सांगण्यात येते.

Web Title: Corona threat until August says donald trump

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com