उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के

उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत. भूकंपाच्या धक्कामुळं लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील रावळपिंडी या ठिकाणी असल्याची माहीती आहे. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी आहे.

हरियाणा, पंजाब, दिल्ली, काश्मीर, हिमाचल प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात भूकंपाचे धक्के बसले. काश्मीरमधील राजौरी, पुंछ, जम्मू, उधमपूर आणि रामबनमधील काही भागात भूकंपाचे धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले.तर पाकिस्तानात भूकंपामुळं 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com