VIDEO | राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचा रात्रीस खेळ चाले

VIDEO | राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचा रात्रीस खेळ चाले


मुंबईः  भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. परंतु, ते आता पाळत नाहीत, अशी टीका करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप खोटारडे असल्याची टीका केली. तर भाजपचे नेते व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी असे आश्वासन भाजपने शिवसेनेला कधीच दिले नव्हते, असे स्पष्टीकरण दिल्याने भाजप-शिवसेना यांची गेल्या ३० वर्षापासून सुरू असलेली युती अखेर तुटली. 

शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असे वारंवार सांगणाऱ्या व मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेसाठी आजचा दिवस हा राजकीयदृष्ट्या फार घातक ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी धरून राज्यात सरकार स्थापन केले आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना तसेच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचं सरकार स्थापन होणार असताना आज राज्यात भल्या पहाटे राजकीय भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबतच आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात राज्यपालांनी फडणवीस व अजित पवार यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे.

राज्यात नवं सरकार स्थापन झाले असले तरी राष्ट्रवादीतील किती आमदार अजित पवार यांच्यासोबत जाणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काही दिवसांनंतर फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारा १४५ चा जादूई आकडा ते सिद्ध करण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणूक निकालानंतर भाजपकडे सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसताना आणि शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने भाजप-शिवसेना यांचं युतीचं सरकार अस्तित्वात आलं नाही.


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com