VIDEO | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मुंबईत मंत्रालयासमोर दूध फेको आंदोलन

VIDEO | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मुंबईत मंत्रालयासमोर दूध फेको आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज मंत्रालयासमोर दुध फेको आंदोलन केलंय. रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकोनॉमिक पार्टनरशीप कराराला विरोध करत हे आंदोलन करण्यात आलंय. थायंलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत. या आंदोलनादरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टींनी देखील सरकारविरोधात घोषणाबाजी केलीये.

रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकोनॉमिक पार्टनरशीप  कराराला विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जनता दलाने मंत्रालयाच्या गेटवर दूध फेको आंदोलन केलं. हा करार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करण्यात येतोय. आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. 

आग्नेय आशियाई राष्ट्र समूह आणि त्यांच्याशी व्यापारी भागिदारी असलेले भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान व दक्षिण कोरिया यांचा समावेश असलेल्या देशांच्या गटातर्फे रिजनल काॅम्प्रहेन्सिव इकाॅनाॅमिक पार्टनरशिप (आरसेप) या व्यापार विषयक करारावर आज (सोमवारी) सह्या करण्यात येणार आहेत.

भारतातर्फे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकांक येथे होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या करारातील तरतुदी या भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहेत. कारण दुधासह अनेक गोष्टींवरचे आयात शुल्क कमी करावे लागणार असून त्यामुळे चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड या देशातील मालाने भारतीय बाजारपेठा भरून जाणार आहेत. यामुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी आणि इतर घटक आणखी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये अशी जनता दल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

WebTitle : doodh feko agitation on the main gate of mantralaya to oppose RCEP deal
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com