लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा मंदिराच्या पंचधातुच्या कळसाची चोरी करणाऱ्या चोराना अटक

लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा मंदिराच्या पंचधातुच्या कळसाची चोरी करणाऱ्या चोराना अटक

पुणे : लोणावळ्यातील कार्ला येथील आगरी व कोळी बांधवांचे कुलदैवत असलेल्या प्रसिद्ध एकविरा मंदिराच्या पंचधातुच्या कळसाची चोरी करुन पलायन केलेल्या चोरटयांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोघाच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडुन कळस जप्त करण्यात आला.

पंचधातुचा व अडीच किलो वजनाचा 
राहुल भागवत गावंडे व सोमनाथ अशोक गावंडे (दोघेही रा. धामणगाव, अवारी, ता. अकोले, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिड वर्षापूर्वी 3 ऑक्टोबर 2017 ला चोरीचा गुन्हा घडला होता.

दोघांनी मंदिराच्या मागील बाजुस असलेल्या जंगलात कळस लपवुन ठेवला होता. आरोपी यात्रेसाठी आले होते असे पाटील यांनी सांगितले.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com