एव्हरेस्ट बेस कँपवर सोलापुरातील ट्रेकर्सची चढाई 

एव्हरेस्ट बेस कँपवर सोलापुरातील ट्रेकर्सची चढाई 

सोलापूर : येथील "ट्रेक लव्हर्स ग्रुप'च्या वयाची चाळिशी पार केलेल्या सदस्यांनी एव्हरेस्ट बेस कॅंपवर यशस्वी चढाई केली. एव्हरेस्ट बेस कॅंप 5360 मीटर उंचीवर आहे. 

या मोहिमेमध्ये सोलापुरातील शिरीष दंतकाळे, लक्ष्मी आणि सुरेंद्र शिरकोली, दादा चांदणे, संगीता जोशी, डॉ. शैलेश पाटील, डॉ. रूपा आणि राजू कामत (पुणे), अदिती कामत, सीमा पाटील आणि तेजस्विनी चांदणे यांचा समावेश होता. नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरून या मोहिमेसाठी जावे लागते. बर्फाळ पर्वतावरील वातावरण अनुकूल नसल्यास ही मोहीम धाडसी ठरू शकते. भूकंप,हिमस्खलन अशा नैसर्गिक आपदांचीही भीती असते. अशा स्थितीत सोलापूरच्या ट्रेकर्सनी ही मोहीम यशस्वी केली. यापूर्वीही या ग्रुपने हिमालय आणि हिमाचल प्रदेशातील विविध ट्रेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. 

बेस कॅम्प आणि तिथून दिसणारे हिमनग संमोहित करतात. अतिशय मेहनत आणि परिश्रमाने प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत बेस कॅंपवर पोचल्यानंतर जे हिमदर्शन घडले, त्यामुळे मोहिमेचा शीण पळून गेला.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com