घटस्फोटानंतरही सुझानकडून हृतिक रोशनला स्पेशल बर्थडे विश!

घटस्फोटानंतरही सुझानकडून हृतिक रोशनला स्पेशल बर्थडे विश!

बॉलिवूडमधला हॉट अभिनेता हृतिक रोशनचा आज 46वा वाढदिवस! 'कहो ना प्यार है' या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला हृतिक निवडक पण उत्तम कथानक असलेल्या भूमिका करण्यासाठ फेमस आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही त्याने बरेच चढ-उतार पाहिलेत. मधल्या काळात पत्नी सुझान-हृतिक या जोडप्याचा घटस्फोट झाला, त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक बदल घडले. पण घटस्फोट झाल्यानंतरही हृतिकच्या प्रत्येक वाढदिवसाला त्याला हटके पद्धतीने शुभेच्छा देणं सुझानने काही सोडले नाही. हाही वाढदिवस त्याला अपवाद नाही. हृतिकच्या स्पेशल दिवसाची सुरवातच सुझानच्या मस्त बर्थडे विशने झाली... कसं केलंय सुझानने हृतिकला बर्थडे विश बघू...

सुझानने हृतिकच्या बर्थडे दिवशी सकाळीच इन्स्टाग्राम व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत त्याला स्पेशल विश केलंय. या फोटोंमध्ये हृतिक त्याची मुलं रेहान आणि रिधान यांच्यासोबत दिसतोय. या फोटोला सुझानने 'Happiest Happiest Birthday Rye... you are the most incredible Man I know..' असं कॅप्शन दिलंय. त्यासोबतच तिने त्याच्या दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात आणि बेस्ट डॅडी अॅवॉर्ड आणि बेस्ट फिलॉसॉफर असे दोन हॅशटॅग दिले आहेत.   

सुझान सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असते. मागील आठवड्यातच सुझानने त्यांच्या न्यू ईयर व्हेकेशनचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हे सर्व कुटूंब फ्रान्समध्ये सुट्या एन्जॉय करायला गेलं होतं. तिथे बर्फात खेलतानाचा फोटो सुझानने इन्स्टाग्रावर शेअर केला होता. या वेळी या चौघांसोबत त्यांचे भाऊ, बहिण, आजोबा असे सर्व होते. 

सुझान आणि हृतिकचा 2000 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर काही वैयक्तिक वादांमुळे 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. असे असले तरी ते दोघं त्यांच्या मुलांसाठी एकत्र येतात. प्रत्येत वर्षी मुलांसोबत ट्रीपला जातात. सुझान आणि हृतिक प्रत्येक वाढदिवसाला एकमेकांना गोड शुभेच्छाही दिताना दिसतात. त्यामुळे घटस्फोट झाला असला तरी दोघांमध्ये एकमेकांप्रती आदर आहे हे यातून स्पष्ट होते. 

काही दिवसांपूर्वीच हृतिकचा 'वॉर' हा चित्रपट आला होता. हृतिकसोबत टायगर श्रॉफचीही यात मुख्य भूमिका होती. आता हृतिक त्याच्या आगामी क्रिश चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तर सुझान खान इंटेरिअर डिझायनर असून तीचं मुंबईमध्ये होम डेकॉरचं बुटीक आहे. दोघांचाही घटस्फोट झाला असला तरी दोघंही आपापल्या आयुष्यात समाधानी आहेत.

Web Title: Ex Wife Sussane wishes Hritik Roshan on his Birthday

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com