शिळी खीर खाल्याने पन्नासपेक्षा अधिकांना विषबाधा

शिळी खीर खाल्याने पन्नासपेक्षा अधिकांना  विषबाधा

सोलापूर : अक्कलकोट तालुक्‍यातील सलगर गावांमध्ये लग्नात राहिलेली गव्हाची शिळी खीर खाल्यानंतर पन्नासपेक्षा जास्त जणांना विषबाधा झाली. अस्वस्थ वाटू लागल्याने या सर्वांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सलगर गावात सोमवारी लाडप्पा धडके यांच्या घरात लग्नकार्य होते. लग्नात कामाला आलेल्या महिलांनी लग्नात राहिलेली खीर मंगळवारी गावातील लोकांना वाटली. खीर खाल्यानंतर सर्वांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरु झाला. अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काहींना पुढील उपचारासाठी सायंकाळी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत रुग्णांना दाखल करण्यात येत होते. 

52 जणांना विषबाधा; 8 बालकांचा समावेश

खीर खाल्यानंतर 52 जणांना विषबाधा झाली. सर्वांना दुपारी तीन वाजता अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केलेल्या रुग्णांपैकी काहींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यात आठ लहान मुलांचा समावेश आहे. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात डॉ. अशोक राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या देखरेखीखाली रुग्णांना ठेवण्यात आले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com