आज अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

आज अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई : दुपारी 12 वाजता मुंबईत ते प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असल्याने अनिल गोटेंनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. तसंच स्थानिक राजकारणात फारसं महत्त्व दिलं जात नसल्याने गोटे पक्षापासून दूर झाल्याचंही सांगण्यात येत होतं.

भाजपमधील नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय आणि धुळ्याचे भाजपचे माजी आमदार अनिल गोटे आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी आमदार अनिल गोटे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या दिवशी ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. मुंबईत हा प्रवेश होणार आहे. 

एकनाथ खडसे गटातील आणि त्यांचे निकटवर्तीय अनिल गोटे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईला रवाना झाले आहेत. त्याचबरोबर शिरपूरमधील भाजपचे जितेंद्र ठाकूर यांनी याआधीच राष्ट्रवादीत प्रवेश निश्‍चित केला आहे. तेही आज गोटेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्याही राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा सुरु होत्या. पण, त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: former BJP MLA Anil Gote enters NCP in Mumbai

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com